उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आमदार देवतळे यांच्या हस्ते सुमन कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न...

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


वरोरा - दिनांक ११ एप्रिल २०२५ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सुमन कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.प्रथमत: गणपती पूजन व दर्शन करून सुमन कार्यक्रमांचे पोस्टरचे उद्घाटन केले.जे वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी सुमन कार्यक्रमांची पोष्टर प्रदर्शनी लावली होती.नंतर एक गरोदर माता व एक स्तनदा माता यांचा शाल,ब्लाऊज पिस,बेबी गादी,ब्लाकेट देवून सत्कार करण्यात आला.स्नेहा प्रमोद संसारे व पुनम भुषन आपटे यांचा सत्कार करण्यात आला प्रयोजन हेच कि या दिवशी सुमन दिवस म्हणजे सुरक्षित मातृत्व दिवस.यामध्ये गरोदर असतांनी व बाळंतपणानंतर आई आणि बाळांची काळजी घेणे दर्जेदार सेवा देणे.सुरक्षीत सेवा देणे, सर्व योजना व सुवीधा देणे.मान सन्माने वागवणे व सन्मानपुर्वक वागणूक वागणुक देणे.माताम्रुत्यु व बालम्रुत्यू चे प्रमाण करणे आणि माता बालसंगोपन व्यवस्थीत पार पडणे हा आहे.त्या दिवसाचे उद्घाटन करण देवतळे आमदार यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला सर्व



 अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व आमदार प्रतींनीधी व कार्यकर्ते तसेच रुग्ण नातेवाईक हजर होते.हा कार्यक्रम डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी मेहनत वंदना विनोद बरडे अधीसेवीका,विजया रूयिकर पसे., इंदिरा कोडापे पसे,मिना मोगरे अप.,निर्मला देशमुख कक्षसेविका, लक्ष्मीकांत ताले मेट,छोटू मडावी यांनी मेहनत घेतली.व कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments