डॉ. आंबेडकर जयंती निमित्त विश्वरत्न युथ फाउंडेशन रामनगर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन...

. गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्य विश्वरत्न युथ फाऊंडेशन रामनगर गडचिरोली तर्फ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक १४ एप्रिल २०२५ सकाळी ७ वाजता रेड्डी गोडावून चौकातुन भव्य बाईक रॉली गडचिरोली शहराच्या प्रमुख मार्गाने फिरणार आहे. रॉलीत उत्कृष्ठ वेशभुषा धारकांना योग्य बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. दुपारी १२ वाजता भोजनदान देण्यात येणार असुन सांयकाळी ७ वाजता इंदिरा गांधी चौकात १३४ किलो चे लाडु व भारतीय संविधानाचे पुस्तक वाटप करण्यात येणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वरत्न युथ फॉऊडेंशन रामनगर गडचिरोली च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments