युवा पिढीच्या बाईक रॅलीने गडचिरोली शहर दुमदुमले....

 .

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली



 गडचिरोली - *विश्वरत्न युथ फॉउडेंशन गडचिरोली* च्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध उपक्रमांनी गडचिरोली शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यांत आली. *सकाळी शिवाजी चौक (रेडडी गोडावुन) ते गडचिरोली शहरातील प्रमुख मार्गाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यांत आलेले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.मुनीश्वर बोरकर , धर्मानंद


 मेश्राम यांनी बाईक रॅलीला निळी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात केली. सदर रॅलीत मोठया प्रमाणात व उत्साहात शहरातील तरुणाई सहभागी होऊन निळे झेंडे व जय भीम च्या जयघोषाने संपुर्ण गडचिरोली शहर भीममय करण्यांत आले. तसेच रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकावत सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच चंद्रपुर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयावजळ अभिवादन करुन सविधान चौक येथे रॅलीत उत्कृष्ट वेशभुषाधारक म्हणुन देवयानी सिडाम, वेदांशी दुर्गे, प्राची मेश्राम यांना मा. खासदार डॉ. नामदेव किरसान गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र यांचा हस्ते भारतीय सविधान देऊन सन्मानित करण्यांत आले. तसेच आयु. आम्रपाली सिध्दार्थ रामटेके यांचे कडुन रॅलीत सहभागीना भोजदान देऊन रॅलीचे समारोप करण्यांत आले.*
*सायंकाळी इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे 134 किलोचे लाडु वितरीत करण्यांत आले. तसेच अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयांयाना महापुरुषावरिल दोन प्रश्न विचारुन अचुक उत्तरे देणाऱ्यांना भारतीय सविधान देण्यात आले. स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करणारे युवक/ युवती मोठया संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे हा उपक्रम अभ्यासु विद्यार्थ्यांना खुप आवडला असुन असेच उपक्रम राबविण्याबाबतच्या सुचना केल्यात. तसेच बाबासाहेबांची जयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता.


*विश्वरत्न युथ फॉउडेंशन चे सर्व सदस्य तसेच आपण सर्वांनी केलेल्या सहकार्य व सहभागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य विविध उपक्रम राबविण्यात आले.

0/Post a Comment/Comments