गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी नागभीड
नागभीड _ विदयार्थी जिवनात झालेल्या संस्काराची शिदोरी आयुष्य भर पुरत असते योग्य संस्काराने खरा माणूस घडत असतो अनेक चांगल्या सवयी बरोबरच स्वछते विषयी तो जागृत व्हावा स्वछता हा प्रत्येकाचा श्वास व्हावा स्वचछेतेतूनच समृद्धी चा मार्ग जातो ही गोष्ट विदयार्थी दशेतच त्यांच्या मनावर बिंबवली जावी या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व्दारा दरवर्षी राज्य स्तरीय स्वच्छ शाळा प्रती योगितेचे आयोजन करण्यात येते यावर्षी या स्पर्धेत राज्य भरातून ४६ शाळांची निवड झाली असुन यात चंद्रपूर जिल्ह्यातून दोन शाळा पात्र ठरल्या आहेत त्यात कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय नागभीड चा समावेश असून नुकतेच अंतिम परीक्षणासाठी गांधी तिर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे राज्य समन्वयक माननीय गिरीश कुलकर्णी यांनी आपले सहकारी चंद्रशेखर पाटील आणि संजय जाधव यांचेसह विद्यालयास भेट दिली वर्ष भर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमा बाबत जाणून घेण्या च्या उद्देशाने आयोजित विद्यार्थी संवाद समारंभात राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थी यांचेशी मनमोकळेपणाने संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयिका रजनी चिलबुले यांनी केले तर शरयू दडमल यांनी पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले
Post a Comment