न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली शिंदेवाही - भुक या सुप्रशिद्ध नाटकाचे लेखक डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे ५५ यांचे शिंदेवाही गॅस एजन्सी जवळ ट्रॅक च्या धडकेत आज दि. 3 एप्रिल २०१५ रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले. डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे यांचे अनेक नाटके गाजली परंतु भुक या नाटकाचे आतापर्यंत पाचसे प्रयोग झालेत अश्या या भुककारांचे आज दुदैवी निधन झाले. ते शिंदेवाही येथील रहिवासी असुन ते आपल्या टु व्हिलर गाडीने शहरात पती पत्नी चंद्रपूर रोडकडे जात असतांना समोरून ट्रॅक आली व प्रेमकुमार यांना उडविल्यामुळे ते ट्रॅक च्या खाली गेलेत तर पत्नी बचावली त्यांना सामान्य रुग्णालय शिंदेवाही येथे भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यु घोषीत केले.
त्यांच्या अकस्मित निधनामुळे शिंदेवाही शहरात शोककळा पसरली. डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे हे केवळ नाटककारच नव्हते तर ते फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता व उत्तम व्याखानकार होते. ते माध्यमिक शिक्षक पेशात होते. ते बामसेफ कॉडर कॅम्प बेस से प्रमुख होते तर त्यांचा रिपब्लिकन पार्टीची सुद्धा जवळीक संबंध होता.आपल्या उल्लेखनिय व्याख्यानातून समाज प्रबोधन करणारे होते. त्यांच्या निधनामुळे नाट्यसृष्टीतच नव्हे तर आंबेडकरी समाजात दुःखाचे वातावरण पसरले.
Post a Comment