गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
बाळकृष्ण उंबरकर तालुका प्रतिनिधी
नागभीड
नागभीड _ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा हा सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असुन शेवटच्या टोकावरील व्यक्ती सुद्धा पक्षासाठी महत्वाचा असून सर्व पदाधिकारी व कार्य करते यांनी पक्षाला संघटनात्मक दृष्टया मजबूत करुन स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी तयार व्हा असे सुतोवाच ना. आशिष शेलार यांनी नागभीड येथील भाजपा जनसंपर्क कार्याल्यात केले राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री मा.ना. श्री आशिषजी शेलार यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यांच्या दौरया प्रसंगी नागभीड येथे भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री बंटीभाऊ भांगडीया यांनी ना. आशिष शेलार यांचा शाल श्रीफळ पुस्पगुछ देत स्वागत व सत्कार केला या बरोबरच नागभीड तालुका भाजपा व महीला आघाडी तसेच महाशिवरात्री महोत्सव समिती व्यापारी संघ मानिंग वाक संघटना यांच्या वतीने शेलार यांचा सत्कार करण्यात आला आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचा विकासात्मक व
संघटनात्मक आराखडा मंत्री महोदयासमोर ठेवला नागभीड महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने नागभीड येथे सुसज्ज सांस्कृतिक सभागृह व ३०० वर्ष जुणी परंपरा असलेल्या नागभीड महाशिवरात्री महोत्सव ला शासकीय स्वरूप देण्याचे निवेदन मंत्री महोदय यांना देण्यात आले यावेळी व्यासपीठावर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे भाजपा नेते कृष्णभाऊ सहारे चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तरवेकर माजी नगराध्यक्ष प्रा उमाजी हिरे भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके महीला आघाडी अध्यक्ष इंदुताई आंबोरकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवेशभाऊ पठाण सचिन आकुलवार यांच्या सह सर्व बुथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख पंचायत समिती प्रमुख यांच्या सह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
Post a Comment