नागभीड तालुक्यातील तळोधी. सावरगाव परिसरातून रेती तस्करी जोमात मात्र महसूल प्रशासन कोमात असल्याची चर्चा...

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
बाळकृष्ण उंबरकर 
तालुका प्रतिनिधी 
नागभीड 


नागभीड तालुक्यातील तळोधी _ सावरगाव परीसरातुन मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी सुरु आहे रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने अवैध रेती तस्करीला वाव मिळत आहे दरम्यान रेती तसकराकडून प्रशासनाचे खिशे गरम होत असल्याने कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने संशयाचे बोट प्रशासनाकडे दाखविले जात आहे तळोधी _सावरगाव परीसरातील वाढोणा बोकडडोह नदीमधुन रेतीची तस्करी रात्री पासून पहाटे पर्यंत नांदेड सोनुली तुकुम वाढोणा सावरगाव तळोधी येनोली येथील तसकराकडून दररोज अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे रात्री च्या सुमारास गाव रस्त्यावरुन अवैध रेतीची वाहतूक सुरु असल्याने ट्रॅक्टरच्या  आवाजाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .ही अवैध रेती घर व इतर बांधकामासाठी वापरली जात असून दुपट दराने विकली जात आहे रेती वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर बिना नंबरचे आहेत हा सर्व प्रकार प्रशासनाला माहित असुनही यात प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी आपले हात ओले करून अवैध रेती तसकराकडे डोळे झाक करीत  असल्याचे दिसुन येत आहे. आणि महसूल प्रशासन कोमात गेल्याची जनमानसात चर्चा सुरू आहे.त्यामुळे महसूल




 प्रशासनाने रेती तसकरावर आळा घालण्यासाठी नाके उभारुन याठिकाणी महसूल कर्मचाऱ्यासह पोलीसांचा सहभाग असलेल्या पथकावदारे गस्त ठेवावी व रेती तसकरावर कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. रेती तस्करावर कायमस्वरूपी मोठे कारवाई होणार का असा प्रश्न जनमानसाला पडला असून कारवाई कधी होणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments