गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
मुनीश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली - प्रस्तावित्त विमान विकसित कंपनीला भुसंपादक करावयाच्या प्रस्तावास मुरखळा परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असुन सदर प्रस्तावास शासन मंजुरी देत असेल तर शरद पाटिल ब्राम्हणवाडे व इतर शेतकरी सहीत दिनांक २८ एप्रिल २०२५ पासुन मुरखळा सर्वे न. ३२४ मधे आमरण उपोषण करीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहे. प्रस्तावित् विमानस्थळ कनेरी , पारडी , मुरखळा , नवेगांव , मुडझा व पुलकल या भागात
होणार असुन प्रस्तावित्त विमान विकसित कंपनी नागपूर यांना सदर परिसरातील भुसंपादक करावयासाठी तसा प्रस्तावही शासनाने या खाजगी कंपनीकडे दिल्याचे कळते. त्यामुळे सदर परिसरातील शेतकरी भूमीहिन झाल्याशिवाय राहणार नाही. सदर खाजगी कंपनी शेतकऱ्यांच्या जमीनी कवळीमोल किंमतीत विकत घेईल व सदर परिसरातील कास्तकारांना कंगाल करेल. संध्या सदर परिसरातील शेतकरी बारमाही पिक काढून आपली उपजिविका करीत
आहेत. अश्या खाजगी कंपनीकडून भुसंपादन होत असेल तर शेतकऱ्यांच्या तोंडचा घास शासन हिरावून घेत आहे. सदर परिसरातील ग्रामपंचायतीने प्रस्तावित विमान स्थळाला आमसभेत ठराव मंजूर करून शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला तरीही खाजगी कंपनी बळजबळीने विमान स्थळ बांधकामासाठी तयारी करीत आहे. याचा सदर परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.
यापूर्वी चामोर्शी रोड सेमाना समोरील वनविभागाच्या जमिनिवर विमानास्थळ बांधावयाचे ठरविले होते. परंतु अचानक मुरखळा - पुलकल कनेरी - पारडी या ठिकाणी विमान स्थळ बांधकाम करण्याची खाजगी कंपनी जोर करीत आहे. त्यामुळे याचा विरोध करीत शरद पाटिल ब्राम्हणवाडे शेतकरी कनेरी पारडी हे २८ एप्रिल २०२५ पासुन उपोषणाला बसणार आहेत. सदर परिसरातील शेतकऱ्यांचा त्यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे.
Post a Comment