गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपुर शिरशी येथील नयना विकास नवघरे या महिलेच्या घरून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्र व मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना दिनांक 19. _4_2025 ला सकाळी उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार गणेशपुर शिरसी येथील विकास नवघरे व त्याची पत्नी नयना विकास नवघरे दिनांक 18 4 2025 शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास जेवण करून घराच्या बाहेरील हॉलमध्ये झोपी गेले होते. सोबत त्यांची मुलगी झोपली होती आणि हॉलचा दरवाजा टेकून ठेवला होता. नयना विकास नवघरे ह्या महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून मोबाईल समेत आपल्या उशाखाली ठेवून झोपी गेली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास नयना विकास नवघरे ह्या मुलीला पाणी पिण्यासाठी देण्याकरिता उठल्या असता तिला
उशाखाली मंगळसूत्रव मोबाईल दिसला नाही. लगेच नयना नवघरे पतीला उठवून सांगितले आणि दोघेही पती-पत्नी मोबाईल मंगळसूत्र शोधू लागले. मोबाईल व मंगळसूत्र शोधत असताना गावातील कविता फूकटे व अनिल शेलोटे हे दोघेजण विकास नवघरे यांच्या घरी येऊन त्याने सांगितले की तुमच्या मोबाईल वरून आम्हाला फोन आला आणि फोन वरती कोणीतरी अज्ञात व्यक्ती बोलत बोलत होते असे सांगितले मात्र विकास नवघरे आणि नयना नवघरे यांनी सांगितले की संपूर्ण घराची चौकशी आम्ही केली इकडे तिकडे अंगणात शोधा शोध केली असता आम्हाला कुठेही मोबाईल व मंगळसूत्र कुठे दिसले नाही कोणीतरी
अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र मोबाईल चोरून नेले अशी त्यांनी सांगितले . घरातील किमती वस्तू गेल्याने विकास नवघरे याने सकाळी उठून घडलेल्या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी आरमोरी ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले लगेच विकास नवघरे यांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून 19/04/2025 ला आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये घटनेची तक्रार दिली. आरमोरी पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 ,305 अंतर्गत गुन्हा दाखल केलेलाआहे घटनेच्या पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत
गणेशपुर येथे गाव परिसरात चोरीची घटना होवू नये याकरिता पोलिसांनी घडलेल्या घटनेची चौकशी करून अज्ञात चोरट्याविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी आता गाव परिसरातील जनतेकडूनजोर धरू लागली आहे.
Post a Comment