गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - मी आमदार असतांना जमशेट्टची टाटा गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनीज बघण्याकरीता व कारखाना काढण्याकरीता तयार होते. परंतु त्यावेळच्या कांग्रेस सरकारने त्यांना सहकार्य केले नाही. आज भाजपच्या सरकारने अविकसित गडचिरोली जिल्हयाचा कायापालट केला. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला . खंड्यात गेलेले रस्ते तयार झालेत. माझ्या खासदारकीच्या काळात वडसा गडचिरोली व प्रताबगड रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. अश्या प्रकारचे मार्गदर्शन नॉशनॅल अवार्ड
कार्यक्रमाप्रसंगी केले. मिडिया फाऊंडेशन मुंबई Ex7 News तर्फे मिडिया अवार्ड कार्यक्रम हाटेल लॉडमार्क चंद्रपूर रोड गडचिरोली येथे माजी खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन Ex7 मिडिया प्रमुख ब्रम्हानंद तिवारी मुंबई , पदश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे , मानवाधिकार आयोगाचे जिल्हा प्रमुख डॉ. प्रणय खुणे , कार्यकारी अभियंता साखरवाडे गडचिरोली , राष्ट्रवादी कांग्रेसच्या महिला प्रमुख तनश्री धर्मराव बाबा आत्राम ,विनोद तिवारी , चौधरी , पौणीमा विश्वास आदि लाभले होते. याप्रसंगी डॉ. खुणे म्हणाले की, जास्त मस्ती केलास तर तुला गडचिरोली पाठवितो. आता तसे राहीले नाही. प्रणय खुणे म्हणाले की जिल्ह्यात खनीज संपत्ती , वन संपत्ती असल्यामुळे मागास जिल्हयाचा विकास झपाट्याने होत आहे , गडचिरोलीचा आवाज कानाकोपऱ्यात पोहचत आहे. गडचिरोली ची विचारधारा मिडियाने भारतभर पोहचविण्याचे काम करावे. मिडिया प्रमुख ब्रम्हानंद तिवारी यांनी
गडचिरोलीच्या विकास करण्यासाठी तत्पर असुन गडचिरोली विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यक्रमात मंचकावरील बसलेल्या पाहुण्यांना नॉशनॅल अवार्ड पुरस्कार , शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उद्योजक , पत्रकार , बेरोजगार बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment