गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
_मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्य अभिवादन तथा मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गेडाम सर होते तर प्रमुख आतिथी म्हणून विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शेख भिवगडे चौधरी ठाकरे देशकर घ्यार जांभूळे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते माता रमाई च्या जीवनावर आधारित सुंदर गिताचे गायन केले विध्यार्थ्यानी आपल्या मनोगनातून डा बाबा साहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य्यता नष्ठ केली वर्ग ६ व ७ विच्या विध्यार्थ्यांनी तथागत गौतम बुध्द व बाबा साहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा परिधान केल्या व त्यांच्या जिवनावर आधारित सुंदर सामुहिक नृत्य सादर केले त्यानंतर गेडाम मुख्याध्यापक सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगनातून डा बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्याना आधुनीक भारताचे शिल्पकार म्हणतात असे मत मांडले या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्ग ९ वीची विध्यार्थिनी स्नेहा समर्थ व आभार प्राजक्ता सहारे हीने मानले
Post a Comment