गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली - शिक्षण खात्याचे उपसंचा
लक उल्हास नरड यांना दि. ११ एप्रिल चे रात्रौ आरमोरी रोड गडचिरोली नरड ते त्यांच्या निवासस्थानी असल्याचे नागपूर पोलीसांना कळताच त्यांनी रात्रौ ८चे दरम्यान त्यांच्या घराची ' बॅक खाते ,पासबुक , मोबाईल व अवैध संपत्तीची तपासणी झाडाझडती घेतली व रात्रौ १० चे दरम्यान त्यांना नागपूरला घेऊन गेलेत. सदरची कारवाई कश्याबद्दल होती हे अजुनही गुलदस्त्यातच आहे. परंतु सदरची कारवाईमुळे संपूर्ण विदर्भातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असुन त्यांच्या व्यवहार संबंधी काही शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांचे सुद्धा धाबे दणानले आहेत.
उपशिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचे शिक्षण विभागातील घोटाळे , शालांत आयडी प्रकरण , मुख्याध्यापक पदाचा अवैध मान्यता किंवा संस्थाचालकाकडून उलट - सुलट कामे करून घेऊन यातील घोटाळे प्रकरण होवू शकतात अशा तर्क - वितर्क सुरु आहेत. यापूर्वी विदर्भातील काही
शिक्षणाधिकारी , वेतन पथक अधिक्षक यांना अटक झालेली आहे. विदर्भातील बऱ्याच शिक्षण महर्षी सोबत उल्हास नरड यांचे चांगलेच संबंध आहेत. यातूनही घोटाळा निर्माण होवू शकतो परंतु उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी अटक का केली यांचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु सदर घटनेमुळे गडचिरोली जिल्हयात खळबळ उडाली आहे.
Post a Comment