वेतन पथक अधीक्षक दिलीप मेश्राम यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार...


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली -गडचिरोली वेतन व भविष्य निर्वाह पथक( माध्यमिक) येथील अधीक्षक दिलीप विठोबाजी मेश्राम 31 मार्च 2025 ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा सत्कार त्यांच्या कार्यालयात करण्यात आला. दिलीप मेश्राम हे आपल्या सेवाकाळात आपले कार्य उत्तम प्रकारे सांभाळून संबंधित कर्मचाऱ्यासी मनमिळावू पणे वागत होते. कमाईची लालसा न



 बाळगता काम म्हणजे माझे कर्त्यव्य प्रमाणे वागले म्हणुन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . सत्कार करतांना माजी मुख्याध्यापक मारोती गोंगले, जितेंद्र मेश्राम, चरणदास पाटील, केशव भालेराव, प्रमोद राऊत, राहुल बनकर, हेमंत रामटेके. यांनी कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या सेवेचा व भविष्याची वाटचाल बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments