गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
नागभीड
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
नागभीड तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तळोधी बिटातील तळोधी बा येथील गुराखी राजेश्वर जुमडे वय २३ हा आपले गुरे चारायला शेताकडे गेलेला असताना झुडपात बसलेल्या बिबट्या ने हमला केल्याने गुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्याला तात्काळ तळोधी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले परंतु जास्त जखम असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले संबंधित घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा मोकका पंचनामा केला असता बिबट्या ने हमला केल्याचे आढळून आले त्यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे जखमीला नुकसान भरपाई देण्याची मागणी जनतेनी केलेली आहे
Post a Comment