वेळेला महत्व प्रामाणिकपणे काम व वरिष्ठांचा शब्द प्रमाण ही त्रिसूत्री मी स्वतः अवलंबली व इतरांनाही शिकवली.. निवृत्ती कानडे .निवृत्ती कानडे यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात संपन्न...


सुपर फास्ट न्युज 
वृत्तसेवा 
*प्रतिनिधी : दिलीप अहिनवे*
मुंबई 


पुणे, दि. ३ : मुंबई महापालिका सेवानिवृत्त कनिष्ठ पर्यवेक्षक निवृत्ती कानडे यांचा ८० वा वाढदिवस पुण्यातील खराडी स्थित तनिष्क सोसायटीमध्ये १ एप्रिल रोजी उत्साहात साजरा झाला. ८० व्या वाढदिवसाला "सथाभिषेक" तसेच "अष्टोत्तरशतक" म्हणतात. जो आयुष्याच्या ८० वर्षाच्या समाप्तीच्या आणि १००० पौर्णिमेचा साक्षीदार होण्याचा दिवस मानला जातो. लोक या दिवसाकडे कुटुंब, घर, आणि समुदायाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडण्याचा एक टप्पा म्हणून पाहतात.
निवृत्ती कानडे यांचा वाढदिवस साजरा करताना ८० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी मुंबईहुन त्यांच्या २० ते २५ मित्रांना आमंत्रित केले होते. याबाबत त्यांना माहिती दिली नव्हती. मोठा मुलगा भुषण सातव्या मजल्यावर राहतो. लिफ्टचा दरवाजा सातव्या मजल्यावर उघडल्यावर समोर उपस्थित मित्रांना बघुन त्यांना गहिवरुन आले. सर्व उपस्थितांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. घरात आल्यावर अनेक मित्रांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.



निवृत्ती कानडे यांनी शुभेच्छांचा स्वीकार करताना सांगितले की, मी मुंबई महापालिकेत अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. सेवानिवृत्त होऊन २२ वर्षे झाली तरी माझे सहकारी, माझ्या हाताखाली काम केलेले शेकडो शिक्षक आजही माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी फोन केला किंवा नाही केला तरी मी सर्वांना आवर्जून फोन करतो. वेळेला महत्त्व, प्रामाणिकपणे काम व वरिष्ठांचा शब्द प्रमाण ही त्रिसूत्री मी स्वतः अवलंबली व इतरांनाही शिकवली. त्यामुळे मला मुंबई महापालिका सेवेत काम करताना कधीही अडचणी आल्या नाहीत.
कार्यक्रमाचे आयोजन त्यांची पत्नी पुष्पावती, मुलगी मनिषा, मोठा मुलगा भुषण, सूनबाई अश्विनी, नात विदुला, नातू केयांश, छोटा मुलगा मिलिंद, सूनबाई शितल, नातू यशमित यांनी उत्तमरित्या केले होते. या निमित्ताने नातेवाईक सुनील दुर्गाडे, सुभाष दुर्गाडे, सुरेखा दुर्गाडे, अशोक कांडपिळे, लक्ष्मी कांडपिळे, अविनाश वाडकर, आरती वाडकर, नंदा व सुरेखा उपस्थित होत्या.
मुंबई महापालिका सेवेत कार्यरत असलेले तसेच सेवानिवृत्त झालेले अनेक अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ. प्रवीण माने, बलवंतराय देसाई, सुभाष दास्ताने, राजेश गाडगे, रवींद्र परदेशी, जयंत निशाणे, मधुकर माळी, रेणू निशाणे अर्जुन अंभोरे, हृदयनाथ पाटील, काशिनाथ माळी, रमाकांत शेरेकर, दादासाहेब ओव्हाळ, लखन जाधव, सचिन नेवासे तसेच त्यांचे वर्गमित्र विष्णू जगताप हे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुलगा भुषण कानडे यांनी केले. सूत्रसंचालन अर्जुन अंभोरे यांनी तर शेवटी सर्वांचे आभार त्यांची सूनबाई अश्विनी कानडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments