.
गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली. नागपूर - जागतिक आंबेडकरी सहीत्य महामंडळ नागपूर या संस्थेच्या अकराव्या वर्धापन दिना निमित्य पुरस्कार व वितरण सोहळा आयोजीत करण्यात आलेला होता यात कवि अजय रामटेके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अजय रामटेके यांच्या चक्रीवादळ आणि सुर्यसंदेश या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. राजेश गायकवाड सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या हस्ते अजय रामटेके यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
30 मार्च २०२५ साहित्य संघ नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिपक कुमार खोब्रागडे , उदघाटक डॉ. प्रकाश करमाडकर . कुलगुरु त्रिपुरा , डॉ. जगन कन्हाडे , डॉ. विधाधर बनसोड डॉ. सुनिल
रामटेके , अभिनेत्री बबिता डोळस' डॉ. विलास तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पाह पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. भुपेश पाटिल संचलन डॉ.अनिल काळबांधे तर आभार प्रा. काजल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विदर्भातील साहित्यीक , कवि बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment