गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली: महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन संलग्न आयटक गडचिरोली जिल्हा कौन्सिल च्या वतीने , आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या,किमान वेतन लागू करा,दिवाळी बोनस दरवर्षी दोन हजार रुपये देण्यात यावे, कोरोना थकीत मानधन ग्राम पंचायत, नगर परिषद व नगर पंचायत कडून तातडीने देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 7 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालय वर विशाल मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले आणि त्या नंतर मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष काँ. विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्या नंतर सुद्धा 31 महिन्याचा दरमहा 1000 रू.थकीत मोबदला आता पर्यंत जिल्यातील अनेक ग्राम पंचायत, नगर परिषद व नगर पंचायत ने दिलेला नाही त्याची तातडीने अमंलबजावणी करावी.
कोरोना नंतर ज्या कामाचा मोबदला शासन स्तरावरून मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफत मध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानधन वाढीकरता केंद्र शासनाचे विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे. गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मजारी दर्जा देऊन शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे.आशा व गट प्रवर्तक यांना रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, १० हजार रुपये मासिक पेन्शन व २ हजार रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळावा तसेच त्यांना
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यात यावे,योजना व्यतिरीक्त कामे सांगू नये, वीणा मोबदला कोणत्याही कामाची आशा व गट प्रवर्तक यांना शक्ती लादू नये.डिसेंबर पासून वाढीव मानधन थकीत आहे तो त्वरीत कोणत्याही प्रकारची कपात न करता देण्यात यावा याशिवाय अन्य मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या.
आंदोलनाचे नेतृत्व आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे जिल्हाध्यक्ष कॉ.देवराव चवळे,संघटक चुनीलाल मोटघरे,संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ. सरिता नैताम, कार्याधक्ष कॉ.विद्यादेवी येजुलवार,छाया शेडमाके, माया कांबळे, करुणा गुरनुले, किरण गजभिये,सपना पट्टेम,लक्ष्मी कवडो,उज्वला चांदेकर,शीला टेकाम, सुरेखा तोटावार, निवृत्ता सयाम, अंतकला जाळे,किरण गांधारे,सपना मजूमदार, अनुप्रिया भसारकर यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या चळवळीला कमजोर करण्याकरता मानधनाची तफावत ठेवून द्वेष निर्माण करण्याचा घाट महायुती सरकारने केला. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून राज्य शासनाला भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असे कॉ.देवराव चवळे सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन कामगार कायदे लागु करत असून त्यामधून कामगारांना किंवा कामगार चळवळीला मोठे धोके उत्पन्न होणार असून त्याविरुद्ध केंद्र - राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध कामगारांनी आयटक चे नेतृत्वात संघटितपणे लढा लढणे गरजेचे आहे.
येत्या 27 व 28 एप्रिल 2025 रोजी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटक चे राज्य अधिवेशन गोंदिया जिल्हा येथे आयोजित केला असून पहिल्या दिवशी होणाऱ्या विशाल रॅली मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा सचिव कॉ.सरिता नैताम यांनी केले.
सदर आंदोलनात यावेळी जिल्हाभरातील बहुसंख्येने आशा व गट प्रवर्तक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment