धम्म वसुंधरा विपश्यना केंद्राच्या वतीने मा. आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो 


*दिनांक:- ३१ मार्च २०२५*
*देसाईगंज:- जगाला शांती करुणा व मैञिची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांनी दु:ख मुक्तिचा मार्ग म्हणून विपश्यना ध्यानसाधनेची शिकवण दिली. या ध्यानसाधनेचे केंन्द्र देसाईगंज येथिल धम्मवसुंधरा हे असुन आपल्या आमदारकी च्या कार्यकाळात या केन्द्राकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा यासाठी २०.०० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन मार्ग तयार करुन दिला. त्या ञृणाची परतफेड म्हनुण आज मा. आमदार कृष्णा गजबे यांचा शाल पुष्पगुच्छ व बुद्धमुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.*


*देसाईगंज येथे धम्म वसुंधरा विपश्यना ध्यानसाधना केंन्द्र हे निसर्गरम्य वातावरणात तयार केलेले असुन या केन्द्राकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे शिबिराला जाण्यासाठी साधकांना पावसाळ्याच्या वेळी चिखलातुन व खालखोल खड्यातुन जावे लागत होते. पर्याय नसल्याने काही कालावधीसाठी ध्यानसाधनेचे शिबिर बंद ठेवावे लागत होते. साधना केन्द्राचा परिसर हा शेतशिवारयुक्त व वनहक्काचा असल्याने त्याठिकाणी शासकिय योजनेतुन रस्ता निर्माण करणे अडचणिचे असल्याने साधकांची अडचन लक्षात घेत तत्कालिन आमदार कृष्णा गजबे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन मार्ग तयार करण्याची मंजुरी घेऊन २०.०० लक्ष रुपयाचा निधी नगर परिषद देसाईगंज ला उपलब्ध करुन दिला. मुख्य अधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांनी निविदा प्रक्रिया पुर्ण करुन

 रस्ता बांधकाम पुर्ण करुन दिला रस्ता तयार झाल्यामुळे विपश्यना साधनेसाठी जाणाऱ्या साधकांना तसेच १० दिवसिय विपश्यना शिबिराचा मार्ग ही सुकर झाला त्याची क्रृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी धम्म वसुंधरा विपश्यना साधना केन्द्राच्या वतिने मा. आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार करण्यात आला.*


*या प्रसंगी राजरतन मेश्राम समिती अध्यक्ष सहा आचार्य पुरुषोत्तम दुधे उपाध्यक्ष इंजि जयदेव मानकर सचिव रुपेश सुखदेवे कुषाबराव लोणारे वनपाल रमेश घुटके चंदुजी राऊत देशमुख चिंतलअम्मा डॉ वंदना धोंगडे यांचेसह साधक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.*


0/Post a Comment/Comments