कुरखेडा तालुक्यातील बेलगाव येथील घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल...


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
 संपादक 
मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली. कुरखेडा - कुरखेडा 
तालुक्यातील बेलगांव येथील एका अल्पवयीन मुलीवर दोघे नराधमांनी अन्याय अत्याचार करून अब्रु लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे अल्पपवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून त्याच गावातील दोघावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी जेल मधे करण्यात आली. दि. १५ मार्च २०२५ दुपारी दोन चे सुमारास बेलगांव येथील अनु.जातीची अत्यवयीन मुलगी दुकानात चॉकलेट घेण्याकरीता गेली व घराकडे जातांना याच गावातील भावेश राजु कोरेटी वय २४ वर्ष व कोरेटी मोरेश्वर नामदेव कोरेटी वय २४ वर्ष या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून छेडछानी



 करून नालीवर झोपवले व तिच्यावर बळजबरीने अन्याय अत्याचार केला. ९व्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून व प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या बनायानुसार कुरखेडा पोलीसांनी भावेश व मोरेश्वर यांच्या विरोधात कलम ७४ ,3 ( ५) व पोस्को अर्तगत कलम ८ व १२ अर्तगत गुन्हा दाखल करून आता त्या दोघाची रवानगी कारागृह करण्यात आली असून गावात शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणुन कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्रा वाघ गावात बैठका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

0/Post a Comment/Comments