गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली गडचिरोली - चांदाळा वरुन गडचिरोली कडे येणारी दुचाकी गाडी एका छोट्यास्या झाडाला आदळल्यामुळे दोघेही रस्त्याच्या खाली गाडीसहीत पडले. गाडीची मोडतोड झाली परंतु दोघेही गंभीर जखमी आहेत. दिनांक १५ मार्च २०२५ सांयकाळी ५. ४५ चे दरम्यान आदित्य सुर्यवंशी वय २३ व त्याचा मित्र MH 33 A 8009 या पलसर गाडीने येत असतांना गडचिरोली वनविभागाच्या लाकुड डेपो जवळ टर्निनवर टु व्हिलर झाडाला आदळली त्यामुळे गाडीसहीत ते
दोघेही रस्त्याच्या खाली कोसळले व गंभीर जखमी झालेत त्यापैकी एक मुलगा गुपचुप - पावभाजी चा धंदा करणारा होता. जमावातील काही व्यक्तीने अपघात धारकांना सहकार्य केले परंतु १०८ गाडी व गडचिरोली पोलीस एक तास उशिरा पोहचले. त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.
Post a Comment