गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
मिळालेल्या माहितीनुसार
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे दिनांक 5 -3 -2025 बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या स्वतःच्या घरी कोजबी येथील वयोवृद्ध इसम नामे ताराचंद येडमे अंदाजे वय 55 वर्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 6-3-2025 गुऱवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. ताराचंद येडमे याने 27-2-2025गुरवारला रात्रीच्या सुमारास स्वतःच्या पत्नीवर वासल्याने वार करून स्वतःच्या पत्नीला गंभीर जखमी केले होते .आणि स्वतःलाही चाकूने भोकसल्याने दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. दोघेही पती-पत्नी यांना गडचिरोली येथे
रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते .मात्र ताराचंद येडमे यांची प्रकृती मध्ये सुधारणा झाल्याने त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले होते. ताराचंद येडमे यांनी दिनांक 5 -3 -2025 मंगळवार रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊनआत्महत्या केली. सकाळच्या सुमारास शेजाऱ्यांनी पाहिले असता घराचे संपूर्ण दरवाजे आतून कडी लावली असल्याने घर शेजारील लोकांना संशय निर्माण झाल्याने खिडकीतून लोकांनी डोकावून बघितले असता ताराचंद येडमे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. गावातील सरपंच कविता ताडाम यांनी पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली .
गावातील पोलीस पाटिल माधुरी सहारे यांनी लागलीच घटनास्थळावर. दाखल होऊन आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळावर आरमोरी पोलीस दाखल होऊन मृताचा पंचनामा करून मृताचे शव शवविच्छेदनाकरिता आरमोरी येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत. मृतक ताराचंद येडमे याने 27-2-2025गुरवारला रात्रीच्या सुमारास स्वतःच्या पत्नीवर वासल्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केले आणि स्वतःलाही चाकूने भोकसून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र मृतक ताराचंद येेडमे याने एवढे मोठे टोकाचे पाऊल का? बर...! उचलले असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
Post a Comment