जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार डॉ. पेंदाम यांच्याकडेच कायम ठेवा, विविध आदिवासी संघटनांची मागणी...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर-
संपादक गडचिरोली 


 *गडचिरोली* - गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल कल्याण रुग्णालयामध्ये वैद्यकिय अधिक्षकाचा पदभार हा डॉ. प्रशांत पेदांम (class - १) यांच्याकडे आहे. विशेष बाब अशी कि, येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक हे पद class१ संवर्गाचे आहे. या जिल्हयात डॉ. प्रशांत पेदांम हे class१ संवर्गातील आहे. त्यामुळे सद्या त्याच्यांकडे तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे. मात्र काही class -२ वैद्यकीय अधिकारी राजकीय दबाव निर्माण करुन class १ अधिकारीला हटवून स्वतः ते पद काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकारामुळे जिल्हयातील आदिवासी समाजात तीव्र असंतोष प्रसारला आहे. महिला विविध आजाराने ग्रस्त आहेत, जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महिला रुग्णालय सुरू केले व class १ अधिकाऱ्यांची वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु काही डॉक्टर class २ चे असून सुद्धा त्यांना class १ पद हवे असल्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणुन पात्र अधिकाऱ्यांना कनिष्ठ पदावर काम करावे लागत आहे. त्यामुळे पात्र अधिकाऱ्यांन मध्ये नैराश्य पसरत असुन याचा विपरीत परिणाम इथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णावर होत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिक्षक महिला रुग्णालय गडचिरोली या पदावर class १ संवर्गातील डॉ. प्रशांत पेदांम (class१) यांच्याकडे कायमस्वरुपी देण्यात यावा. कोणत्याही दबावातून class२ कडे पदभार देवून रुग्णाच्या जीवीताशी खेळळू नये. अन्यथा जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. माधुरी किलनाके मँडम यांना निवेदनातून देण्यात आली. तसेच संबंधित निवेदनाची प्रत मा. आरोग्य मंत्री महाराष्ट्र, मा. डॉ. आशिष जयस्वाल सह-पालकमंत्री गडचिरोली, उपायुक्त आरोग्य विभाग नागपुर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
- यावेळी आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेश ऊईके, सुरज मडावी, एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, सदानंद ताराम, कै. बाबुराव मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाबराव मडावी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गेडाम, विनोद मडावी, सिंधु आदिवासी बहुउद्देशिय विकास संस्थाचे अध्यक्ष डॉ. चेतन कोवे, राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार चे शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, संध्या ऊईके, मिनल चिमुरकर, जंगोरायताड आदिवासी महिला समितीच्या आरती कोल्हे, विद्या दुगाआदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments