गडचिरोली
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - भामरागड - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जुब्बी येथील पुसु गेब्बा पुंगाटी वय ६० वर्ष यांची दि. २९ चे रात्रौ नक्षलवाद्यांनी हत्या केली. प्राप्त माहितीनुसार पुसु पुंगाटी कुटुंब रात्रौ झोपी गेले असता रात्रोच्या सुमारास शस्त्रधारी नक्षलवाद्यांनी झोपेतून उठवुन पुसुला जंगलात घेऊन गेले व त्यांची हत्या केली. सदर परिसरात एकच खळबळ माजली. पुसु पुंगाटी ह्या शेतकऱ्यांचा मुलगा एक प्राध्यापक , दुसरा कोर्टात वकील तर सुन पोलीस शिपाई आहे. पोलीस खबऱ्या म्हणुन नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment