गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
. गडचिरोली २९ - गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल जिल्हा असुन या जिल्ह्यातिल आदिवासिंना विकासाच्या मुख्य प्रवाहात आनण्याकरिता शासन प्रशासन युद्ध स्तरावर प्रयत्न करत असतांना अहेरी येथिल निवासी इंग्लिश मिडियम वस्तिगृहातिल एका आदिवाली विद्यार्थ्याला वस्तिग्रृहाच्या अधिक्षकाकडुन चपलेने बेदम मारहान करण्याचा अमानविय प्रकार उघडकिस येताच वंचित बहुजन आघाडी चे लोकसभा प्रभारी प्रा हितेश मडावी यांनी गडचिरोली चे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन सबंधित अधिक्षकावर गुन्हा दाखल करुन सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी केली . अहेरीच्या निवासी इंग्लिश मिडियम वस्तिग्रृहात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्याला अधिक्षक पदावर कार्यरत असलेल्या इश्वर शेवाळे यांनी आपल्या शरिराची मालिश करण्यास सांगितले विद्यार्थी जोर लावुन मालिश करत नसल्याने संतापलेल्या अधिक्षक इश्वर शेवाळे याने शिविगाळ करत चपलेने बेदम मारहान केली .विद्यार्थ्याच्या शरिरावर मारहाणिचे अनेक व्रण उमटले . अतिदुर्गम भागातिल आदिवासी समुहाला विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरुन अनेक प्रयत्न होत असतांना आदिवासी विद्यार्थ्याला अमानविय पद्धतिने केलेली मारहाण ही घटना अतिशय निंदनिय तथा मानुष्किला काळिमा फासणारी असुन अश्या अघोरी क्रृत्य करणार्या वस्तिग्रृह अधिक्षक इश्वर शेवाळे याचेवर गुन्ह्याची नोंद करुण सेवेतुन तात्काळ बळतर्फ करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे गडचिरोली चिमुर प्रभारी प्रा हितेश मडावी यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातुन केली या प्रसंगी वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रेम जगझाके ,उषा निमगडे , सोनलदिप देवतळे , पियुष सडमाके ,संतोष खोब्रागडे ,भाविता गेडाम यांचेसह वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते .
Post a Comment