जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय चामोर्शी व प्राथमिक आरोग्य केंद्र आममगाव (महाल) यांच्या संयुक्त विद्यमाने जा.कू.बोमंणवार कनिष्ठ महाविद्यालय येथे आरोग्य व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न...

 
गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
पी.के. सातार 
तालुका प्रतिनिधी 
चामोर्शी 


दिनांक 08/03/2025
 रोज शनिवारला जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम RKSK विभाग ग्रामीण रुग्णालय चामोर्शी व प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव ( महाल ) यांच्या वतीने जा. कृ.बोमनवार तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे आरोग्य मार्गदर्शन व



 हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती रोशनीताई वरघंटे नगर सेविका नगर पंचायत चामोर्शी. तसेच प्रमुख



 अतिथी म्हणून प्रा. इंदिरा नागदेवते ह्या होत्या. यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्व, किशोर वयीन आरोग्य, रक्ताशय आजार या विषयावर वेद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी चे मा.डॉ केतन तलमले सर.प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव




 (महाल) चे वेद्यकीय अधिकारी मा. डॉ.रुचिका कराडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तसेच स्त्री भ्रूण हत्या या विषयीची शपथ कु. तमीस राऊत अधीपरिचारिका ग्रामीण




 रुग्णालय चामोर्शी याच्या कडून घेण्यात आली. या कार्यक्रमाला श्री. पुरुषोत्तम घ्यार समुपदेशक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी. कु. बन्सोड अधीपरिचारिका. कु स्नेहल कोडापे अधीपरिचारिका ग्रामीण रुग्णालय




 चामोर्शी. आदी कर्मचारी वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments