. गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - लाखांदुर - लाखांदुर तालुक्यातील मौजा खैरी / पट येथील शेतकरी आपल्या शेताला पाणी देण्याकरीता मोटार पॅम्प सुरू करण्याकरीता गेला असता वाघाने त्यांचा फरश्याच पाळला .
खैरी / पट , विहिरगांव. डांभेविरली व टेंभरी परिसरात गेल्या १० - १५ दिवसापासून वाघाचे दर्शन होत असल्याची चर्चा होती. तर वाघाने जनावरांना ठार मारल्याचे ऐकविण्यात येत असतानांच दि. 30 मार्च च्या सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान खैरी / पट येथील डाकराम देशमुख नामक शेतकरी मोटार पॅम्प सुरु करण्याकरीता गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांचेवर उडी घेऊन डाकराम चा फरश्याच पाडला. डाकराम घरी न परतल्यामुळे घरच्या मंडळी
सहीत गावकऱ्यांनी त्याचा शोधाशोध केला शेवटी आज पहाटे खैरी / पट स्मशान भूमी जवळ त्याचे अर्धवट प्रेतच आढळले नव्हे वाघाने त्याच्या शरीराचे रात्रभर दोन तुकडेच केले होते. सदर परिसर हा वाघ प्रतिबंधित क्षेत्र असुन सुद्धा व वाघ जनावरांना ठार करीत असतांना वनविभाग लांखादुर मात्र झोपतच होते. प्रेत शवविच्छेदनास ग्रामीण रुग्णालय लाखांदुर येथे नेण्यात आले असुन वनविभाग व लाखांदुर पोलीस अधिक तपास करीत आहेत .
Post a Comment