गड़चिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
पी.के. सातार
तालुका प्रतिनिधी चामोर्शी
दिनांक 01/03/2025 रोज शनिवारला श्री संतोष भाऊजी राऊत वय 50 वर्ष रा. गणपूर रै हे नेहमी प्रमाणे दुपारच्या सुमारास आपल्या शेतात मक्याला पाणी करण्यासाठी गेले होते. मात्र त्याच मक्यात दब्बा धरून बसलेला वाघाने संतोष राऊत यांच्यावर उडी मारून वार केला आणि डाव्या पायाचा मास पूर्णपणे खाऊन शरीरावर अनेक वार केला. त्यामुळे संतोष यांचा जागीच मृत्यू झाला.परिसरातील लोकांनी घटनेची
माहिती पोलीस पोलीस प्रशासन व वनविभागाला देण्यात आली पोलीस प्रशासन वनविभाग यांनी घटनास्थळावर दाखल होवून बॉडीचा पंचनामा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आले. मृत शेतकऱ्याच्या पाच्यात त्यांच्या आई,वडील, पत्नी, मुलं. आहेत. अचानक वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिवारामुळे दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव
परिसरात व आप्तेष्ट नातेवाईक यांच्यामध्ये मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घडलेल्या घटनेवरून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी व परिसरातील जनतेकडून जोर धरू लागली.आहे .
Post a Comment