गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
धानोरा
विवाहित तरुणाची पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून निघून गेल्याने आणि तिचा इतरत्र कुठेही शोध न लागल्याने ही बाब मनावरती घेवून विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 15 मार्च 2025 ला उघडकीस आली शीलवंत आनंदराव सहारे वय 27 वर्षे राहणार एरकड असे आत्महत्या केलेले युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील येरकळ येथील शीलवंत
आनंदराव सहारे व 27 वर्ष याची पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून अचानक निघून गेली मात्र ती आपल्या माहेरी पोहचली नाही इतरत्र कुठे शोध घेतला असता तिचा पत्ता लागला नाही. मात्र ही बाब शीलवंत आनंदराव सहारे यांनी मनावरती
चांगलीच घेतल्याने त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आल्याने त्याने 15 मार्च रोजी आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. शीलवंत सहारे यांनी नैराशेतून आत्महत्या केली असावी असे जनतेमधून बोलले जात आहे .मात्र आत्महत्या मागचे स्पष्ट कारण सखोल चौकशी केल्यानंतरच कळेल.
Post a Comment