रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने उडविले घोट चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे कठडे, दोन वर्षापासून कॅमेरे बंद...

 गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
 




 गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील घोट मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा असुन पुतळ्या भोवती वॉल कंपाऊंड , करडे व गेट लावले आहे. दि. ११ मार्च २०२५ च्या रात्रौ अज्ञान ट्राक्टर वाहनाने पुतळ्या भोवतालच्या भिंत व कटडेला उडविले. वास्तविक पाहता सदर चौकातील रस्ता रेगडी , घोट , कन्सोंबा मार्खडा व चामोर्शी अशा मोठा चौरस्ता असुन सुद्धा कुणाच्या तरी अज्ञान वाहनाने भिंत फोडली. ग्रामपंचायत घोट कॉमेरे लावले की कुणी कॉमेरे लावले होते हे कळू शकले नाही संध्या घडीला दोन वर्षापासून कॉमेरे बंद अवस्थेत आहेत. रात्रोच्या वेळेस रेगडी मार्गातून रेती तस्करी केल्या जातो. याकडे वनविभाग घोट च्या कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष असल्या सारखे वाटतो. मागील वर्षी याच चौकातील झेंडा सुद्धा कुणीतरी अज्ञान नव्हे पागल माणसाने निळा ध्वज ओढला होतो सदर प्रकरणात पोलीस स्टेशन घोट च्या ठाणेदारांनी पागल माणसास पकडले होते. पोलीस विभाग घोट सहानुभुती म्हणुन सदर काम दुरस्ती करून दिले परंतु घोट बौद्ध वासीयांचे समाधान झाले नाही अज्ञान वाहनाचा पोलीसांनी शोध घ्यावा अशी मागणी बौध्द समाजाचे अध्यक्ष दहिवले यांनी केली मागेपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला धोका निर्माण होवू शकतो , नाकारता येत नाही. ग्रामपंचायत घोट ने कॉमेरे लावावे व वनविभाग घोट ने रात्रोच्या वेळेस होणाऱ्या रेती तस्करी कडे लक्ष घ्यावे अशी मागणी घोट बौद्ध बांधवानी केलेली आहे

0/Post a Comment/Comments