न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - महाराष्ट्राच्या राजनितिक मधे कांग्रेस पक्षातील मंडळी भाजपात तर कुणी राष्ट्रवादी कांग्रेस ( अजित पवार ) गटात जाण्याची सर्वत्र चर्चा असुन अश्यातच ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्रातील आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक ब्रम्हपुरी नगर परिषदेचे गटनेते विलास विखार , माजी उपाध्यक्ष डॉ. सतिश कावळे , गौरव अशोक भैय्या , माजी सभापती नामदेव लांजेवार , सुरेश दुर्वे , शुकदेव खेने ' स्वप्नील सावरकर ' मोहन वैध , बन्सीलाल कुर्जकार , निलेश चिंचुरकर , आदि महत्वाच्या कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाचा दुप्पट्टा बांधुन भाजपाचे सदस्य बनले त्यामुळे ब्रम्हपुरी कांग्रेसमधे उभी फुट पडली असुन ब्रम्हपुरी कांग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार विजयभाऊ वडेट्टिवार राष्ट्रवादी कांग्रेस की समर्थकांच्या बरोबरीने भाजपात जाणार की कांग्रेसमधेच राहणार अशी जोरदार चर्चा आहे. माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार गेल्या पाच वर्षापासून सत्तेच्या दुर असल्यामुळे ते नाराजीत आहेत. असे सांगीतल्या जाते .
Post a Comment