राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 2 एप्रिल रोजी जंतर मंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन...

गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगणा व आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल 2025 रोजी जंतर-मंतर नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
जात निहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, आरक्षणाची 50% मर्यादा हटविण्यात यावी, क्रिमिलेअरचे उत्पन्न मर्यादा 15 लक्ष करण्यात यावी, तेलंगणात वाढवलेले 42 टक्के ओबीसींचे आरक्षण 9 व्या सूचित टाकण्यात यावे, संविधानाच्या कलम २४३ डी (६) व २४३ टी(६) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना 27 टक्के आरक्षण चा कायदा करण्यात यावा, मंडल आयोग व स्वाभिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्यात, शेतमजूर व शेतकऱ्यांना ६० वर्षे वयानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न देण्यात यावे, ओबीसीसाठी लोकसभा व विधानसभा असे स्वतंत्र मतदार क्षेत्र स्थापन करण्यात यावे, केंद्र सरकारने वार्षिक अंदाजे बजेट तयार करताना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी करिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात यावी,२०१४ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रशासकीय सेवा परीक्षा पास करणाऱ्या परंतु नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असताना त्याचा चुकीचा अर्थ लावून डीओपीटी ने आयएएस होण्यापासून वंचित ठेवलेल्या 314 हून अधिक विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त देण्यात याव्यात. इत्यादी प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच विविध राज्यातून ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होणार आहे.

0/Post a Comment/Comments