सोमनपल्ली बस स्टॉप वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवाच्च शब्द लिहिणाऱ्या वर कारवाई करा, रिपाईची मागणी....

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मुनिश्र्वर बोरकर 
 संपादक 


- गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस स्टेशन अर्तगत सोमनपल्ली गावाजवळ चामोर्शी आष्टी रोडवर सोमनपल्ली बस स्थानक आहे. त्या बससेड च्या भिंतीवर मोठ्या अक्षरावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत कुणीतरी अज्ञानी नव्हे तर



 जातीयवादी व्यक्तीनी अव्वाच शब्दात लिखान केलेले आहे. दि. २० फरवरी गुरुवार २०२५ ची घटना असुन सोमनपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम मेश्राम , बंडु मेश्राम ' सुमीत तावाडे , पत्रकार हस्ते भगत , बंडू कुळवे चामोर्शी यांना सदर बातमी कळली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर बाब रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांना




 कळवताच हे सर्वमंडळी सोमनपल्ली बसस्थानक पोहचले. सोमनपल्ली बससेड जवळ गर्दी जमली. आष्टी पोलीसांना पाचारण करण्यात आले. सदर कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केली.

0/Post a Comment/Comments