गडाचीरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली
आरमोरी - शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी नोव्हेंबर २०२४ पासून मार्केटींग फेडरेशन अंतर्गत खरेदी विक्री विविध कार्यकारी संस्थेच्या मार्फत धान खरेदी सुरु केली होती, बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात धान केंद्रावर दिले असता त्याचा पहिल्या हप्ता ७ डिसेबर पर्यंत मिळाला परंतु त्या पासून दिड महिन्याचा कालावधी लोटला परंतु चुकारे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकर्याना मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे धान कापणो बांधणीचे पैसे लोकांना देणे बाकी आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांचा दैनदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालेला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे त्वरित देण्यात येतील असे सांगितले होते, मात्र दिड महिन्याचा कालावधी लोटून जात असतानाही सरकारने ठोस पाऊल उचल केल्याचे दिसून येत आहे
शेतकरी शेताच्या उत्पादकतेवर उपजीविका भागवीत असतो, असे असताना सरकारने याकडे दुर्लक्ष्य केल्याने बॅकाचे पिक कर्ज उसनवार मुलांचे लग्न समारंभ .उन्हाळी धान मका ईतर पिक घेण्यासाठी खंत औषधी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण जात असल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका
काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी सरपंच अविनाश कनाके राजु सामृतवार ग्रा.प.सदस्य निलकंठ बगमारे स्वनिल ताडाम दिवाकर
पोटफोडे यशवंत खरकाटे दिवाकर नारनवरे राजेश्वर गराडे शालीकराम कत्रे घनश्याम शेन्डे लिलाधर शेन्डे संदिप आठोळे रामचंद्र रोहणकर .मुकुदा गराडे ज्ञानदेव हिरापुरे मनोज गराडे यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment