न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले आदिवासी बाहुल भागातील पेशा अर्तंगत येत असलेले सावरगांव ग्रामपंचायत येथील सरपंच्या वनिता पुडो ह्या कर्तव्यदक्ष सरपंच असुन त्यांनी गावाच्या विकासासाठी गट ग्रामपंचायत असलेल्या सावरगांव ग्रामपंचायतेत १८० घरकुल मंजुर करण्यात यशस्वी ठरल्या जवळपास ९० घरकुलाचे कामे सुरू असून
पन्नेमारा नदिघाटावरून रेटी आणुन घरकुलाचे कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. गावातील रस्ते , नाली बांधकाम ' कलवट ' अंगणवाडी केंद्राचे बांधकाम पुर्ण झाले असुन प्राथ. आरोग्य केंद्राची इमारत बांधकामही होणार असुन सदर गट ग्रामपंचायत सावरगांवात ६ गावे येतात असे सांगुन सावरगावात आविकाचे धान खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकरी 20 कि.मी अंतरावरील
ग्यारापत्ती केंद्रावर धान नेतात त्यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी त्रास सहन करावा लागतो. महामंडळांनी सावरगावात धान खरेदी केंद्र सुरू करावा अशी मागणी केलेली आहे अशी माहिती सरपंच वनिता पुडो यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बातचित करतांना सांगितले.
Post a Comment