गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्र्वर बोरकर
संपादक गडचिरोली
पोर्ला/ गडचिरोली
नवरगांव गावाजवळ हत्तीचा कळप पोहचला आज सांयकाळी. गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनविभाग सर्कल नवरगांव मधील जंगलात नव्हे तर अगदी गावाजवळ आज दि. ११ फेब्रुवारी सांयकाळी ७ चे सुमारास १० ते १२ संख्येनी असलेले हत्तीचा कळप गावाजवळ पोहचला. पोर्ला वरून नवरगांव जाणाऱ्या व्यक्तीला हत्तीचा कळप दिसताच त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली असता नवरगांव गावकऱ्यांनी फटाके फोडून
हत्तीला पळविण्याचा प्रयत्न केला परंतु हत्तीचा हळप अजुनही जंगलातच आहे. सदर घटनेची माहीती पोर्ला वनपरिक्षेत्राचे RFO मडावी यांना माहिती दिली परंतु निष्क्रीय RFO अजुनही नवरगांव पोहचले नाही. अशी माहिती भैसारे यांनी दिली. नवरगांव वासीय भयभित झालेले असुन हत्तीच्या कळपानी मक्याचे वावर नासधुस केले.सदर हत्तीचा कळप मौशीखांब - बेलगांव जंगलातून आल्याचे कळते.
Post a Comment