गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्र्वर बोरकर
संपादक गडचिरोली
देसाईगंज
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी/दीक्षाभूमी देसाईगंज येथे रमाई महोत्सव-२०२५ निमित्त ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिला व मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. ७ फेब्रुवारी ला महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष वैजयंती वाळके मॅडम ब्रम्हपुरी, उद्घाटक प्रा. पुनम दुर्योधन मॅडम आरमोरी तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. हर्षाली खोब्रागडे
मॅडम नागपूर,व विषेश अतिथी मनिषा रामदास मसराम यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर नृत्य स्पर्धा घेण्यात आली परीक्षणाचे काम किरण सहारे व श्रेया आमटे यांनी केले तर संचालन डॉ. वंदना घोंगडे व रश्मि गेडाम यांनी केले. ८ फेब्रुवारी ला दुपारी ११ ते २. आरोग्य शिबीर अध्यक्ष डॉ. विद्या गेडाम वैद्यकीय अधिकारी देसाईगंज, उद्घाटक तारकेश्वरी वालदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. संध्याकाळी महिला, मुलांकरिता वक्तृत्व स्पर्धा व वेषभूषा स्पर्धा कल्पना कापसे, जयश्री लांजेवार व निर्मला घूटके या परीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली संचालन अश्विनी माने तर आभार ममता जांभूळकर यांनी केले. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी मुला, मुलांकरिता रनिंग स्पर्धा घेण्यात आली अध्यक्ष म्हणून सरीता बारसागडे, उद्घाटक कोच विजय मुळे तर विषेश अतिथी रश्मी गेडाम यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी ला उद्घाटक डॉ. मिनाक्षी बनसोड, अध्यक्ष डॉ. रीता राऊत व विषेश अतिथी सुमनताई घोंगडे व भाविका सहारे यांच्या
उपस्थितीत पार पडला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना व सर्व स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा शाॅल व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यात निर्मला जांभूळकर, शालिनी मेश्राम, रेखा टेंभूर्णे, कुसुम बनसोड, भूमिका मेश्राम, सुमनताई घोंगडे, ज्योती वालदे व छाया नंदेश्वर यांचा समावेश होता.कार्यक्रमाला सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज च्या अध्यक्षा कविता मेश्राम, सचिव ममता जांभूळकर सदस्या रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम, ममता रामटेके, प्रतिमा शेंडे, प्रतिभा बडोले, मंदा शिंपोलकर, सल्लागार मारोती जांभूळकर सर व समता सैनिक दल यांनी मेहनत घेतली तर आशिष घुटके, पुरूषोत्तम बडोले, मोरध्वज शिंपोलकर यांनी सहकार्य केले
Post a Comment