सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने लावलेल्या वृक्ष लागवडीवर जनतेने उपस्थित केले प्रश्नचिन्ह? चौकशी करण्याची मागणी......



गडचिरोली  सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली 
नरोटी/ डार्ली 
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने शिर्शी उपक्षेत्रातील नरोटीमाल या गावातील मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड योजनेमधून जवळपास हजार ते बाराशे रोपटे लावण्यात आले. ही रोपटे शासनाच्या नियमाने पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस अगोदर लावणे योग्य असते. मात्र सध्याच्या घडीला हिवाळ्यामध्ये एक ते दीड महिन्यापूर्वी  वृक्ष लागवड करण्यात आली यावरून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने  सदर नियमाला   धाब्यावर बसून वृक्ष लागवड करण्यात आल्याचे दिसते  आहे .मात्र हजार ते बाराशे रोपटे लावलेल्या पैकी प्रत्यक्षरीत्या काही रोपटे ही मेलेल्या अवस्थेमध्ये दिसतात. सामाजिक वनीकरण विभागा कडून सदर वृक्ष लागवड ही निधी खर्च करण्याकरिता की झाडे लावण्याकरिता असा सवाल परिसरातील नागरिकाकडून होत आहे .वृक्ष लागवड कामांमध्ये बोगस मजूर दाखवून निधीचा गैरवापर केल्याची सुद्धा चर्चा परिसरात रंगू लागली आहे. मोकळ्या जागेमध्ये लावलेले संपूर्ण रोपट्यापैकी 30% रोपटे ही नष्ट झाल्याचे दिसत आहे. परिसरातील जनतेमध्ये केलेल्या वृक्ष लागवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सदर कामाची चौकशी करून कामाशी संबंधित दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे असे सुद्धा जनमानसात बोलले जाऊ लागले आहे.
सबंधित दोशिवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे.

0/Post a Comment/Comments