गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - लायड्स मेटल्स अँड एनर्जी या कंपनीला लोहखनिजांची लीज मिळावी म्हणून गडचिरोली जिल्हयातील खासदार, आमदार व इतर नेत्यांनी व नागरिकांनी कोनसरी व गडचिरोली येथिल जनसुनावणी त हाजरी लावून जोरदार भाषण केले व पर्यावरणावर काहीही हरकत न घेता लोहखनिजांच्या लीज ला समर्थन दिले. खासदार व आमदारांच्या या भूमिकेचे जेवढे कौतुक करावे ते कमी पडतील.
१९८० च्या वनसंवर्धन कायद्यांन्वये गडचिरोली जिल्हयातील तुलतुली, कारवाफा , चेन्ना व इतर प्रकल्पांना स्थगिती मिळाली, मोहफुलांपासून दारू बनविण्याच्या शासकिय निर्णयाला स्थगिती मिळाली, कोट्यावधी तेन्दुपत्ता गडचिरोली जिल्हयातून संकलीत होतो परंतु यावर आधारित एकही बिडी कारखाना गडचिरोली जिल्हयात आजपर्यंत सुरू होऊ शकला नाही. याबाबत मात्र गडचिरोली जिल्हयातील खासदार व आमदार गप्प आहेत.
लोहखनिजांसाठी शेकडो हेक्टर जमीन मिळू शकते तर तुलतुली व इतर पाटबंधारे प्रकल्पांसाठी जमीन का मिळत नाही. मोहफुलांपासून दारू काढण्यास परवानगी कां मिळत नाही हा खरा प्रश्न आहे.
गडचिरोली जिल्हयातील खासदारांनी व आमदारांनी उद्योगपतींसाठी कार्य करण्यापेक्षा गडचिरोली जिल्हयातील आदिवासी व गैरआदिवासी जनतेला सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केली आहे.
Post a Comment