गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दि.१७ जानेवारी २०२५
नागपूर ब्युरो
नागपूर, महाल: भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय सदस्यता नोंदणी अभियान व संविधान सन्मान अभियानाच्या प्रमुख पदाधिकारी बैठक आज दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी शिक्षक सहकारी बँक सभागृह, महाल, नागपूर येथे संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत मंचावर भाजपा प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, माजी खासदार अशोकजी नेते, प्रदेश उपाध्यक्ष संजयजी भेंडे,प्रदेश उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरजी सावरकर, आमदार चैनसुखजी सचेंती, भाजपाच्या महिला मोर्चाच्या नेत्या अर्चना ताई दहेनकर, भारती ताई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास आमदारांसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
बैठकीत प्रमुख वक्त्यांनी भारतीय संविधानाचा सन्मान आणि सदस्यता नोंदणी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या मूलभूत विचारधारेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या अभियाना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या बैठकीच्या माध्यमातून संविधानाचा सन्मान जपणे आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करणे या उद्देशाने भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोहिमेस अधिकाधिक यश मिळावे यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठक यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Post a Comment