मा. खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते सगनापूर येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन...

गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा


दि. १८ जानेवारी २०२५ | (चामोर्शी)
ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या दिवस-रात्रकालीन भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मौजा- सगणापुर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे जय श्रीराम क्रीडा मंडळाच्या आयोजनाने संपन्न झाले. उलपुलवार यांच्या आवारात झालेल्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन मा. खा. अशोकजी नेते (राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर उद्घाटन फित कापून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मा. खा. अशोकजी नेते यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत कबड्डीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
*"कबड्डी ग्रामीण भागातील आत्मसन्मानाचे प्रतीक आहे"*
मा. खा. अशोकजी नेते म्हणाले, "कबड्डी हा केवळ खेळ नसून ग्रामीण भागातील युवा शक्तीला एकजूट आणि शारीरिक सुदृढतेचा संदेश देणारा सांघिक खेळ आहे. अशा स्पर्धांमुळे युवकांमध्ये क्रीडाप्रेम जागृत होते आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळते. तरुणांनी खेळात भाग घेऊन शारीरिक आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावे."

तसेच, गावातील समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करत, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी या खेळाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनीही युवकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, तालुका महामंत्री संजयजी खेडेकर, सरपंच पार्वताबाई कन्नाके, उपसरपंच रेवतीताई पोरटे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कन्नाके, योगेश लोडे, प्रकाश उलपुलवार, भोजराज लोडे, सुभाष चुनारकर,मंडळाचे आयोजक ऋषभ बंडपलिवार यांसह गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments