गडचिरोली
सुपर फास्ट न्युज
वृत्तसेवा
आरमोरी
, आरमोरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या जोगीसाखरा मार्गावरील एका नदीतिरावर जंगल परिसरात एक प्रख्यात दारुविक्रेता सर्रासपणे खुलेआम दारुची विक्री करीत असताना संबंधित विभाग आंधळेपणाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर या दारूविक्रेत्याच मुलगा लगतच्याच नदीपात्रातून रात्री, दिवसा सर्रास रेतीची तस्करी करीत असल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभाग सदर पिता- पुत्राचा शोध घेऊन कारवाई करण्याचे धाडस दाखविणार काय? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारुबंदी असली तरी शहरासह गामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोहफुल, देशी, विदेशी दारुचा महापूर वाहत आहे. संबंधित विभाग मात्र लहान विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या विक्रेत्यांची जणुकाही पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरमोरी शहरासह ग्रामीण भागात खुलेआम अवैध दारुविक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरापासून जवळव असलेल्या
जोगीसाखरा मार्गावरील नदीपात्रात या परिसरातील एक प्रख्यात दारूविक्रेता खुलेआम दारूची विक्री करीत असतानाही त्याच्यावर कारवाई करण्यास संबंधित विभाग आंधळेपणाची भूमिका बजावत आहे. याचे नेमके कारण काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. इतकेच नव्हे तर सदर प्रख्यात दारूविक्रेत्याचा मुलगा दिवसरात्र लगतच्याच नदीपात्रातून रेती तस्करी करीत असतानाही संबंधित विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एकंदरीत
• अवैधरित्यार रेती तस्करी करणाऱ्यावर पाळत ठेवून कारवाई करण्यासाठी एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे. रेती तस्कराचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. सदर भरारी पथक रात्री- बेरात्री सुद्धा गस्त घालण्याचे काम करीत आहे. पथकामार्फत रेती तस्करावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.
-सी. एच. नागापुरे, मंडळ अधिकारी, आरमोरी
आरमोरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासकीय, निमशासकीय बांधकामासह खासगी बांधकामे अविरत सुरू आहेत. रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही या बांधकामास रेती येते कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तो प्रख्यात पिता व रेती तस्करी करणारा त्याचा पुत्र यांच्यावर संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी शहरासह ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात आहे.
Post a Comment