गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्र्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
भामरागड,दिं. २० जानेवारी २०२५:
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल अविकसित भामरागड भागात भारतीय जनता पक्षाच्या "घर चलो" विशेष सदस्यता नोंदणी मोहिमेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या अभियानाची जोरदार सुरुवात झाली.
*अभियानाचा हेतू आणि आवाहन:*
"समर्थ भारत आणि विकसित भारतासाठी भाजपाचा भाग बना," असे आवाहन अशोकजी नेते यांनी नागरिकांना केले. या मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक जनतेपर्यंत पक्षाची उद्दिष्टे आणि विकासाची दृष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
*सदस्य नोंदणी प्रक्रिया:*
ऑनलाइन नोंदणीसाठी: ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉलद्वारे नोंदणी.
ऑफलाइन नोंदणी: भामरागड हा अतिदुर्गम भाग असल्याने या भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने विशेष फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली गेली.
या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, सहकार आघाडी, नगरसेवक आणि शक्ती केंद्र प्रमुख यांची उत्साही उपस्थिती होती.
या अभियानाला जेष्ठ नेते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल बिशवास, भामरागड न.पं.च्या नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाका, तालुकाध्यक्ष अर्जुन अलाम, महामंत्री तपेश हलदार, ता.उपाध्यक्ष जाधव हलदार,नगरसेवक सरजू सेडमेक,माजी नगरसेविका रंजु सेडमेक,पोर्णिमा मडावी,लाहेरी शक्ती केंद्र प्रमुख दिनेश घोसरे, ता.उपाध्यक्ष राजेंद्र मडावी, ताडगांवचे जेष्ठ नेते राजुभाऊ तिर्थगीरवार, कमलेश अधिकारी तसेच भामरागडतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भामरागडच्या नागरिकांनी मोहिमेला दिलेला प्रतिसाद हा भाजपाच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचा परिणाम मानला जात आहे. या मोहिमेमुळे पक्षाची ताकद स्थानिक स्तरावर वाढत असून जनतेशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.
अशा अभियानांच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाची नवीन पहाट उगवेल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
Post a Comment