प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नेवासा तालुका कार्यकारिणी जाहिर...

गड़चिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
नेवासा 


नेवासा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नेवासा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली. पत्रकारांच्या अनेक समस्या व भविष्यातील अडीअडचणी यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली व नेवासा येथे लवकरच पत्रकार भवन बांधण्यात यावे यासाठी पाठपुरावा करण्यात यावा या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने अहील्यानगार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नेवासा तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. युनूस शरीफ




 पठाण यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. युनूस पठाण यांनी नेवासा तालुक्यात पत्रकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लिखान करून गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी आदी क्षेत्रातील घटकांना सातत्याने न्याय देण्याचे काम केले आहे. याच कार्याची दखल घेऊन संघटनेने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला आहे.
प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी युनूस पठाण, उपाध्यक्ष आदेश जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब बोधक, कार्याध्यक्ष सुरेश घुंगासे, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय शिंदे, सचिव विकास बोर्डे, संघटक सुमित पटारे, सचिन कुरुंद, सहसचिव संदीप वारकड, सदस्य प्रवीण खरात, गणेश झगडे अशोक सांगळे, राजेंद्र कसबे, मयूर मांडलिक आदींची निवड करण्यात आली. लवकरच विस्तारित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र लिंबोरे, शहाराम आगळे, रंजनदादा जाधव, सुधीर जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल तालुक्यातील विविध संघटना व मान्यवराकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

0/Post a Comment/Comments