गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी/वैरागड
वैरागड आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत कोजबी प्रशासनाच्या विरोधात संतप्त महिलांनी घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी शासनाने करोडो रुपये खर्च करून खोब्रागडी नदी वरून कोजबी ग्रामपंचायत मधील कोजबी,लोहारा, करपडा, सोनपूर या चार गावांसाठी मोठी नळ योजना सुरू केली, परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे निष्क्रिय पणामुळे गेल्या बारा ते पंधरा दिवसापासून नळ योजना बंद असल्याने लोहारा करपडा सोनपूर येथील नागरिकांना हिवाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, नळ योजना सुरू झाली तेव्हापासून नागरिकांना नळाद्वारे येणाऱ्या नदीच्या पाण्याची सवय झाली असल्याने सध्या बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असलेल्या विहिरींचे व बोरवेलचे पाणी पिल्याने नागरिकांना सर्दी पडशांचे आजार बळावले असून याबाबत वारंवार ग्रामपंचायतला पाणी सुरू करण्याविषयी विनंती करण्यात आली परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागल्याने संतप्त महिलांनी माजी सरपंच वैशाली डोंगरवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यावेळी लोहारा करपडा सोनपूर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोर्चेकरी महिलांनी सरपंच यांना फोन वरून फोन करून संपर्क साधून विचारले असता ग्रामपंचायतला सुट्टी असल्याने मी येऊ शकत नाही येत्या दोन-तीन दिवसात नळ योजना सुरू करू
सरपंच कविता ताडाम
Post a Comment