कोसरे कलार समाजाचा सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न...



गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर
संपादक 



 कुरखेडा -
*कुरखेडा: -* मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कुरखेडा येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आदर्श विध्यानिकेतन कानहेंट सभागृहात हळदीकुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले तसेच कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहू अर्जून राजराजेश्वरजी यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मला उईके, प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल, प्रमुख पाहणे पुष्पा बन्सोड, देशमुख,बावनथडे तसेच मंचावर मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी कार्यक्रमाला सभागृह उपलब्ध करून देणाऱ्या निर्मलाबाई उईके यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कलार समाजातील आदर्श नारीशक्ती म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचा समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कलार समाजासाठी पुढाकार घेऊन कार्य करणाऱ्या जिजा आत्राम यांचे पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल म्हणाल्या की, कलार समाजाची एवढी मोठी लोकसंख्या असताना सुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणात कलार समाजाची दखल घेतली जात नाही. कलार



 समाजात आजही बहुसंख्येने सुशिक्षित बेरोजगार आहेत, दुर्गम भागात असलेल्या कलार समाजातील मुलींना शिक्षणासाठी पुढची सोय नसल्याने त्या पुढच्या शिक्षणापासून वंचित आहेत. समाजाच्या अनेक समस्या आहेत. ही परिस्थिती बघून समाजाच्या विकासासाठी तसेच हितासाठी सर्वांत आधी कलार समाजातील महिलांनी बहुसंख्येने एकत्र येणे अत्यंत काळाची गरज आहे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्या शुभ प्रसंगी समाजातील महिलांनी एकमेकींना हळदकुंकू, वाण देऊन स्नेहबंधनाचे धागे विणले सोबतच गीत गायन, उखाणे घेणे, काही खेळ खेळून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी कोसरे कलार समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिजा आत्राम यांनी केले, सुत्रसंचालन अलका बावनथडे यांनी केले तर आभार प्रिया दरवडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments