गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली, दिं. ९ जानेवारी २०२५:रोजी सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे भाजप महिला मोर्चा गडचिरोली जिल्हाच्या वतीने सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी भूषवले.व त्यांनी उपस्थित भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले जिल्हा व विधानसभा स्तरावर व्यापक मोहिमा राबवा.भाजपा सदस्य नोंदणी मोहिम स्थानिक पातळीवर सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करा अहेरी विधानसभेचा यशस्वी अनुभव सांगत अहेरी विधानसभा क्षेत्रातील सदस्यता मोहिमेचा यशस्वी राबविले. आपणही प्रभावीपणे भाजपा सदस्यता राबवावी.असे प्रतिपादन या बैठकीला मा.खा.नेते यांनी केले.
महिला मोर्चा च्या प्रदेश सचिव सौ.रेखाताई डोळस यांनी जिल्ह्यातील सदस्यता मोहिमेला गती देण्यासाठी धोरणात्मक सूचना सादर केल्या. स्थानिक पातळीवर मोहिमा प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देत
येत्या १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनावरही चर्चा करत अधिवेशनासाठी रणनीती आखण्यात पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
ही बैठक अतिशय यशस्वी ठरली असून सर्व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने सदस्यता मोहिमेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी ही मोहिम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला
यावेळी बैठकीला प्रामुख्यानें
सौ. वैशालीताई चोपडे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , सौ. शालिनीताई डोंगरे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , सौ. रेखाताई डोळस भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस, सौ. योगिताताई पिपरे जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा, सौ. गीताताई हिंगे जिल्हा अध्यक्षा गडचिरोली,व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Post a Comment