गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दिनांक: १४ जानेवारी २०२५
चामोर्शि
चामोर्शी:- तालुक्यातील एकमेव क्रीडांगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेला क्रिडागृहासाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाल्यामुळे क्रीडांगणाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी व तहसीलदार यांच्या प्रयत्नांमुळे हे अतिक्रमण हटवण्यात यश आले आहे.
संपूर्ण तालुक्यासाठी एक अद्ययावत व दर्जेदार क्रीडांगण निर्माण करण्याच्या उद्देशाने येथे क्रीडांगणाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या क्रिडागण प्रकल्पाच्या कामाची पाहणी व कामाचा आढावा आज दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी पाहणी करुन घेतला.व चामोर्शीला भेट दिली.
या क्रीडांगणाची पाहणीत मा.खा.अशोकजी नेते यांनी बांधकामाची गुणवत्ता व प्रगतीची माहिती घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर क्रीडांगण प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. "या प्रकल्पासाठी आपण विशेष पाठपुरावा केला असून या क्रीडांगणाच्या निर्मितीत आपले योगदान असल्याचा आनंद आहे," असे ते म्हणाले.
यावेळी सहकार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,जेष्ठ नेते मनमोहन बंडावार,नगरसेविका रोशनीताई वरघंटे,मा.जि.सदस्या शिल्पा राँय,आदिवासी मोर्चा चे जिल्हा महामंत्री रेवनाथजी कुसराम,शहर महामंत्री माणिकजी कोहळे, शहर महामंत्री नरेश अलसावार, शहर महामंत्री वासुदेव चिचघरे, भाजयुमो जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार,भाजयुमो तालुकाध्यक्ष निखिल धोडरे,महिला मोर्चा शहराध्यक्ष कविताताई किरमे, एकनाथजी सातपुते,विनोद किरमे यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडांगण प्रकल्पामुळे चामोर्शी तालुक्यातील खेळाडूंना संधी उपलब्ध होईल आणि क्षेत्राचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
----------------------------------------
*"घर चलो" भाजप सदस्यता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद...*
*मा.खा.अशोकजी नेते*
चामोर्शी:- "समर्थ भारत आणि विकसित भारत घडविण्यासाठी भाजपाचा भाग बना," असे आवाहन करत माजी खासदार व भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. अशोकजी नेते यांनी चामोर्शी शहरातील जनतेला प्रोत्साहित केले.
चामोर्शीत भाजपाच्या "घर चलो" सदस्यता अभियानाला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या अभियानाद्वारे पक्षाची सदस्यसंख्या वाढविण्यात यश मिळाले असून स्थानिक भाजप संघटनेच्या बळकटीसाठी या उपक्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या अभियानामुळे चामोर्शी शहरात भाजपाची ताकद वाढून जनतेशी थेट संपर्क साधला गेला आहे. अभियानाच्या यशस्वीतेमुळे स्थानिक पातळीवर पक्षाचे कार्य अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे.
Post a Comment