आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांची जिल्हाधिकारी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा, नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांचे केले स्वागत...

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 




गडचिरोली  दिनांक 14 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रामदास मसराम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:

ग्रामीण भागातील नागरिकांना जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट सोलर तार फेंसिंग देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली

घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या रेतीपुरवठ्यावर चालू असलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण करता येईल.

जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील प्रशासनाने सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.

आमदार रामदास मसराम यांनी या चर्चेतून जिल्ह्यातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments