परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व सेवकांच्या सहकार्याने देसाईगंज येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन संपन्न.. सेवक संमेलनाला मा. आमदार कृष्णा गजबे यांची प्रामुख्याने उपस्थिती...


गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 




दिनांक:- १९ जानेवारी २०२४*

*देसाईगंज:- आज देसाईगंज शहरात मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेजे हवनकार्य तसेच चर्चासत्र आयोजित भव्य सेवक संमेलन, उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते. यावेळी मा आमदार गजबे यांनी प्रासंगिक सर्व सेवक सेविकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.*

*अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्त समाज घडविण्याची आणि सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परम पूज्य महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी, व्यसनाधीन व गरीब माणसांसाठी परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. परमात्मा एक सेवक मंडळात अनेक जाती धर्माचे लोक असून त्यांनी मानव धर्माची एक नवीन संस्कृती निर्माण केली. या मानवधर्मामुळे देश विदेशातील अनेको सेवकांना याचा फायदा झाल्याचे चित्र समाजात उपलब्ध आहेत. नवयुवकांकडून महामानवाचे विचार व कार्य दुःखी, व्यसनाधीन व गरीब सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य निरंतर सुरू आहेत ही समाधानकारक बाब आहे.*

*या कार्यक्रमास विविध  क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, नागपूर मंडळाचे अध्यक्ष  संचालक गण परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक, सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments