गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
चामोर्शी -चीचडोह प्रकल्प सुरू होऊन 5-7 वर्ष होत आहेत मात्र या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यात आले त्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत योग्य तो आर्थिक मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले असून या संदर्भात आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे निवेदनाच्या माध्यमातून केली असता प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना तातडीने योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
*यासंदर्भात आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदकांना दिले.*
Post a Comment